श्री म. भि नाईक यांचे विषयी थोडक्यात

श्री. म. भि नाईक हे अकौंटंट जनरल मुंबई यांच्या कार्यालया तर्फे सां. बा. विभागात विभागीय लेखापाल म्हणून कार्यरत होते व ते १९८८ साली सेवा निवृत्त झाले.

श्री. म. भि नाईक यांना संत साहित्याचा विशेष व्यासंग आहे. त्यांनी अनेक वर्षे माउलीच्या पालखी समवेत पायी वारी केली असून त्यांनी माऊलीच्या पालखीबरोबर येणा-या प्रमुख दिंड्याच्या माहितीचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. याखेरीज त्यांनी निरनिराळ्या संतांची ८ ते १० चरित्रे लिहिली असून त्यांनी जवळ जवळ १० वर्षे दै. केसरी, संचार आदी वृत्तपत्रातून चिंतन या सदरातून स्तंभ लेखन प्रगट केलेले आहे.

१९८८ सालापासून २५ वर्षे नेताजी सुभाष नगरातील दत्त मंदिरात बालसंस्कार शिबीर चालविले होते. त्यात निरनिराळी स्तोत्रे, गीता पठन, मनाचे श्लोक आदी धर्मिक ग्रंथांचे त्यांनी आयोजन केले होते. त्याचप्रमाणे गेली ३० वर्षे संतसेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात निरनिराळ्या प्रसिध्द कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने आयोजित करून या भागातील लोकांना त्याची गोडी लावली.

वाचनालयात त्यांनी जवळजवळ २५ वर्षे कार्यवाह म्हणून निरपेक्ष वृत्तीने सेवा करून वाचनालयाचे संवर्धन केले व वाचनालयास ‘इतर अ’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला व २००३ साली उत्कृष्ट वाचनालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळवून दिला. श्रीयुत नाईक हे नेताजी सुभाष सोसायटीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. दत्त मंदिरास अनेक वर्षे अध्यक्ष होते व त्या माध्यमातून दत्त मंदिरास अनेक मोठमोठया देणग्या मिळवून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यास हातभार लावला.

Able to take charge as replica hublot chief of man, every cell exudes attractive guy traits. In the workplace, is a replica rolex strong style, can't be held back action. Always can calm judgment, dash, in his own field full of rolex replica confidence, ambition. Life, is the arm for the family and friends to shelter the wind and rain on the solid, full of security. And this is MONSIEUR DE CHANEL men's watch the interpretation of the swiss replica watches bold style agree without prior without previous consultation.