इवल्याशा रोपाचा वृक्ष होताना

नेताजी सुभाष नगरमध्ये लावलेला हा इवलासा वेलु बघता बघता गगनावरी गेला व 150 वर्षाहुनही अधिक वर्षाची परंपरा असलेल्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या खालोखाल सोलापूर जिल्हातील “इतर अ” दर्जा प्राप्त दुस-या क्रमांकाचे वाचनालय झाले.

या वाचनालयाच्या संचालक, अध्यक्ष व कार्यवाहक पदी बरीच सुप्रसिध्द, ज्ञानी व अनुभवी मंडळी गेल्या तीस वर्षात लाभली. वाचनालयाचे पहिले अध्यक्ष म्हणून श्री. रा. बेंद्रे व कार्यवाह म्हणून म. भि. नाईक यांची निवड झाली . या प्रसंगी श्री.म.भि.नाईक यांनी स्वतः जवळील 500 उत्तम ग्रंथसंपदा वाचनालयास भेट दिली व वाचनलयाच्या ग्रंथाची प्रत्यक्ष देवघेव स्वतः सुरु केली. या प्रसंगी अनेक मंडळींनी वाचनालयास देणग्या देवून उपकृत केले. तसेच ब-याच राजकिय व सामाजिक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी वाचनालयास भेट देवून प्रगतीबद्द्ल समाधान व्यक्त केले व प्रशंसा व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय गृहमंत्री ना.श्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर म.न.पा. आयुक्त श्री श्रीनिवासन, ह.भ.प.श्री चैतन्य महाराज देगलुरकर ह.भ.प.वै.दा.का.थावरे, या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाचनालयास भेट दिली आहे.

वाचनालयाची जडण-घडण

सुरुवातीस नेताजी सुभाष नगर मधील छोट्याशा टपरीमध्ये वाचनालयाची सुरुवात झाली. नंतर काही कालावधीनंतर त्याचे स्थलांतर नेताजी सुभाष सोसायटीच्या दत्त मंदीरामागील शेडमध्ये करण्यात आले. वाचनालयाचा व्याप वाढल्यामुळे वाचनालयाचे स्थलांतर नेताजी सुभाष सोसायटीच्या समोर सोलापूर म.न.पा.ने दिलेल्या 1500 स्के. चौ फूट मोकळ्या जागेत वाचनालयाने स्वखर्चाने इमारत बांधली व त्या जागेत स्थलांतर करण्यात आले.

 

म. न. पा. यासाठी अल्प भाडयात ९९ वर्षाच्या कराराने ही मोकळी जागा दिली आहे. त्यांनंतर तत्कालीन खासदार श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या खासदार निधीतून रु. पाच लाखाची देणगी मिळाल्याने वाचनालयाच्या दुस-या मजल्याचे बांधकाम करण्यात आले. त्या हॉलमधे वाचनालयाचा मोफत वृत्तपत्र वाचन विभाग सुरु करण्यात आला व ही जागा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देखील वापरण्यात येत आहे.

Able to take charge as replica hublot chief of man, every cell exudes attractive guy traits. In the workplace, is a replica rolex strong style, can't be held back action. Always can calm judgment, dash, in his own field full of rolex replica confidence, ambition. Life, is the arm for the family and friends to shelter the wind and rain on the solid, full of security. And this is MONSIEUR DE CHANEL men's watch the interpretation of the swiss replica watches bold style agree without prior without previous consultation.